Tuesday, December 6, 2016

नावं!

काही म्हणतात की आठवण माझी काढलेली,
कोणी गोड, तर कोणी कटू काढलेली.
नावं कमावलं म्हणतात पण गमावलं काय ते दिसत नाही,
लोकांना काय तर घरातल्यांनाही माझा एकटेपणा कळत नाही.
नावं जरी असलं, फारसं काही उपयोगी नसतं,
जीवन तसं सारं, एकट्यानेच काढायचं असतं.
वेळ नसतो समजून घ्यायला आजकाल कोणालाचं,
निरर्थक weekdays नंतर weekends ना अर्थ शोधत असतात,
कोणी अंथरुणात, तर कोणी pub मध्ये लोळत असतात.
धावपळीत मंग जगायचं राहून जातं,
वय वाढतं, पण आयुष्य कोठेतरी दूर राहून जातं.
मित्र फारसे उरत नाहीत, नाती फारसी टिकत नाहीत,
नावं मात्र मोठ होतं, पण जगणं काही जमत नाही.
Colleagues फक्त ओळखतात, आणि batchmates ओळख म्हणून नावं काढतात,
पण आयुष्य त्यानी चालत नाही, आणि गरजेला कोणी धावून येत नाही,
गरजेला, कोणीच धावून येत नाही!

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy