Saturday, March 9, 2019

कोण आहे मी?


आयुष्यात भेटलेल्या व्यक्तिंच प्रतिबिंब आहे,
आणि घेतलेल्या अनुभवांचा साठा आहे मी,

मित्रांसोबतचा ब्रम्हानंदाची ओहोळ आहे,
लोकांसोबतच वादांची आठवण आहे,
चिमुकल्यांचा चिवचिवाट आहे,
आणि अनोळख्या व्यक्तींनी अनपेक्षित केलेलं प्रेम आहे,

हजार  जखमा झ्हालेलं एक मन आहे,
भांडणांमधला काडुवारपणा आहे,
आयुष्य वाहून न्हेणारं संगीत आहे,
आणि न सांगितलेल्या भावना आहे मी.

मी, फक्त जगात भेटलेल्या लोकांचा - अनुभवलेल्या क्षणांचा साठा आहे,
मी, म्हणजे फक्त इतकाच आहे?

भर रसत्यात सोडून गेलेल्या लोकांचा आसरा आहे,
ना सांगितलेल्या भावना समजून घेणारा सहारा आहे,
उंच झेप घेऊ पाहणारा पक्षी आहे,
मी एकांत विचार करणारा एक सज्जन आहे,

अंधाऱ्या रात्रीत अडकलेल्यांना दिसणारा एक आशेचा किरण आहे,
भर पुरात फसलेल्या लोकांना मी एक लाकडाचा सहारा आहे,
मी फक्त एक मानसिक आधार आहे,
की मी फक्त एक दुसरा अहंकारी मानव आहे?
कोण आहे मी?

कदाचित, फक्त जगाला फसवत राहणारा,
एक हरवलेला साधारण मध्यमवर्गीय माणूस आहे मी.

Based on Ming D. Liu's "Who am I, you ask?"

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy