Thursday, January 29, 2015

सोडुन गेलीस ..

सोपं होतं जगणं पण तू निघून गेल्यावर अवघड झालंय,
सोप्या अशा माझा सरळ आयुष्यात आता मात्र तुझा आठवणींनी मात्र फार दुखावलंय,
अभ्यासात तर होतोच पण इतर गोष्टींमध्येही छान होतो,
मनही खंबीर होतं, तेच तू आता मोडलास.

सर्व सांभाळून घेतलं असता,
तुला मी कधीच सोडलं नसतं,
स्वतःहून अधीक काळजी घेऊन,
गरीब घरातही सुखानी ठेवलं असतं.

सोडुन जाशील असं कधी वाटलंच न्हवतं,
बोलणं सोडशील या जन्मी हे स्वप्नातही कधी जाणवलं न्हवतं,
सोडण्यासाठी हाथ धरलास असं कधी जाणवलंच नाही,
जन्माचं नातं असं दोन भांडणात तुटतं हे कधी पाटण्या सारखं न्हवतं.

कदाचित तू विसरली नसशील,
कदाचित तू आई-वडलांना बांधील असशील,
पण माझं काय होईल हे कधीच पहिला नाहीस,
एकट सोडुन गेलीस आणि वाट पाहणारा मी कधीच पहिला नाहीस ?

Avishkar '14

रात्र छोटी पडायची आणि गप्पांना वेळ नाही पुरायचा,
कितीही बोललो तरी अजुन थोडं बोलायचं मोह नाही सुटायच.

अनोळखी होतो सर्वे तरी गप्पा खूप रंगायचा,
अविष्कार'१४  चा निमित्ताने वेळ मात्र छानं सारायचा.

पहाता पहाता आठवडा संपला आणि सर्व पुन्हा दूर झालो,
आयुष्यात पुन्हा एकदा खुश मात्र खूप झालो.

चार दिवसांचा प्रवासाने जवळ सर्व खूप आलो,
आठवणींचा पेटाऱ्यात एक दागिना आपण अजुन ओवालो.

पुन्हा कदाचित भेटू ही, गप्पा तशाच मारू ही,
वेळ मात्र तसा नसेल, असला तरी तितका नसेल.

घाईत पुन्हा एकमेकांना पाहुन हसू,
आणि पुन्हा अशीच नवीन नाती घडवु.

चुक तुझीचं असावी......

वर्षे उलटून गेली तरी आठवण मात्र अजुनही येते,
राग नाही येत फारसा पण अजुन डोळ्यात पाणि अजुनही कधी कधी येते.
सारे जुने आठवते पण चुका मात्र सापडत नाहीत,
सर्व काही छान असताना बिनसन्याचं कारण अजुनही समजत नाही.

कदाचित तुच चुकली असशील,
मनात काहितरी लपवुन तू पण खूप रडली असशील,
हळवी असुन तू सुद्धा,
पुर्वी अशी कधीच वागली नसशील!

नवीन आयुष्य!

असंच एके दिवशी सुचलं,
खूप प्रवास केल्यावर,
पुन्हा एकदा जगुन पहावं,
एका नवीन सुर्वातिनं.

झालं गेलं विसरुन सर्व,
पुन्हा शिक्षण घेऊन पहावं,
झालेल्या चुका पुन्हा नं करता,
आयुष्य एक नवीन घडवावं.

सकाळ ते संध्याकाळ काम खुप करावं,
थकुन नीट रात्री स्वस्थ झोपावं,
दिवसाचा आराखडा बनवत पुन्हा,
एका सुर्योदयाची वाट पहावी.

साथ कुणाची नसली तरी,
स्वतःचा हिम्मतीवर एक पाउल पुढे टाकावं,
नवीन अशा जोशात पुन्हा,
एक हे आयुष्य आता दुसर्यांना अर्पण करावं.

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy