Thursday, July 6, 2017

कोकणस्तानी कोकण सोडल्यावर!

कोकणस्तानी कोकण सोडल्यावर,
पावसाळे सारे नाहिसे होतात,
भिजणं, चिखलात घसरण, सारं बंद होतं,
आणि पावसाळे जगणे राहून जातं !

उन्हाळ्यातले घामोळे येत नाहीत,
पण उन्ह मात्र फार जास्ती जाणवत,
त्रास फार जास्ती होतो उन्हाचा,
आणि कोकणातलाच उन्हाळा बरा वाटू लागतो !

आंबे मिळतात राहतो  बाहेरही, पण हापूस मात्रं तसा मिळतं नाही,
नीरा - ताडगोळे आठवून पण, त्या flavour चे ice-cream खाऊन मनं भरत नाही,
छोट्या छोट्या वळणाऱ्या रस्त्यांवर, गाडी चालवायची मजा आठ पदरी रस्त्यांवर येत नाही,
आणि माणसं चांगली जरी भेटली तरी, हळवे, साधेभोळे  कोकणस्थ भेटत नाहीत !

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy