Friday, September 29, 2017

...............!

न पाठवलेल्या emailsची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्ये,
आणि drafts मधल्या mailsनी बऱ्याच, trashची वाट धरली आहे.
Composeही होत नाहीत पूर्वी इतके mails आता,
वेळ सारा चालला आहे formal conversations मध्ये सारा !

दोन-चार पानं mail लिहिणारा मी, आता ४ वाक्यात सारं बोलणं आवरतो,
कोणी मनातलं जाणुन घेईल म्हणून संवादच सध्या टाळतो.
वाट चुकलोय कळतं, पण अजून नवी वाट सापडत नाही,
उद्या तरी सापडेल ही अशा मात्र, अजून मनातनं जात नाही!

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy