Saturday, April 5, 2014

पुर्वीचे मित्र !

मला असा वाटायचं की नाती कधीच तुटत नाहीत,
मित्र कधीच आपली  साथ सोडून जात नाहीत,
काहिही झालं तरिही नाती जपतात,
पैश्यांचा जगातही अजून भावनांची कदर करतात,
आपल्या नकळत आपली फार काळजी करतात.

उगीच जुन्या आठवणी काढून,
चेष्टा मस्करीत वेळ घालवतात,
आणि हसत खेळत मनातला सर्व बोलून जातात,
स्वतःच्या plans मध्ये न सांगता आपल्याला consider करतात,
फक्त आपल्या सोबत न्ह्यायला न जाण्याचं नाटक करतात.

आपल्या वरची संकटं स्वतः वर ओढून घेतात,
असे मित्र मात्र क्वचितंच भेटतात,
हरवलेल्या वाटे वरनं पुन्हा आपल्याला रुळावर आणतात,
Professional life मध्ये आतां माणसं मात्र खूप भेटतात,
पण पुर्वी सारख्या मित्रांच्या मैफिली आता क्वचितच रमतात!!

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy