Thursday, January 29, 2015

नवीन आयुष्य!

असंच एके दिवशी सुचलं,
खूप प्रवास केल्यावर,
पुन्हा एकदा जगुन पहावं,
एका नवीन सुर्वातिनं.

झालं गेलं विसरुन सर्व,
पुन्हा शिक्षण घेऊन पहावं,
झालेल्या चुका पुन्हा नं करता,
आयुष्य एक नवीन घडवावं.

सकाळ ते संध्याकाळ काम खुप करावं,
थकुन नीट रात्री स्वस्थ झोपावं,
दिवसाचा आराखडा बनवत पुन्हा,
एका सुर्योदयाची वाट पहावी.

साथ कुणाची नसली तरी,
स्वतःचा हिम्मतीवर एक पाउल पुढे टाकावं,
नवीन अशा जोशात पुन्हा,
एक हे आयुष्य आता दुसर्यांना अर्पण करावं.

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy