Monday, August 14, 2017

न सांगितलेल्या भावना

उपयोग नसतो उगीच रोज इतरांचा भानगडीत पडण्यात,
काहीच अर्थ नसतो उगाच बरोबर गोष्टींसाठी झगडण्यात,
कोणालाच कोणाचं काही पडलेलं नसतं या दुनियेत,
काहीच शहाणपणा नसतो आपली मते मांडण्यात.

मनं मारून, आहे त्यात समाधान मानता यायला हव,
समाधान नसल तर मान खाली घालून गप्प बसता यायला हवा,
आपलं आयुष्य आपल्याला एकटं एकटं निवांत जगता यायला हवं,
काहीच अपेक्षा न बाळगता, पिंजऱ्यात स्वतःच मनं कोंडता यायला हवं !

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy