Saturday, March 7, 2015

नाती!

नात्यांचीही कमाल आहे,
कधीही जुळतात, कुठेही जुळतात,
कधी ST stand वरच्या माणसांसोबत,
तर कधी परिक्षेला एका बाकावर बसलेल्या मुलासोबत.

अचानकच अशी अनेक नाती बनतात,
काहीच क्षणांत वर्षानोवर्ष साथ देणारे मित्रं भेटतात,
चार शब्दांतच काही माणसे बरीच जवळ येतात,
आणि अपघातांमधेच खरे मित्रं बनतात.

जुळतात तशीच पटकन तुटत नाहीत,
दिवसेंदिवस मानात काही गोष्टी साठत जातात,
एकदाच कधीतरी सर्व गोष्टी बाहेर पडतात,
तेव्हाच तर खरं जवळची माणसे दुरावतात.
नाती बनवण्यापेक्षा निभावणे अवघड असतात,
शब्दांत सांगता येत नाहीत इतकीही काही दुर्मिळ नाती असतात,
बऱ्याच वादांनंतर, बरेचं पावसाळे सोबत पाहतात,
तीच नाती जोपासण्यासारखी असतात!

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy