सर्व काही कसं सुरळीत चालू असतं,
पण सर्व काही असुनही माझं जंग थोडं रिकामं असतं,
इथे इतकी लोकं असुनही एकटेपणा दाटून येतो,
शाळेच्या मित्रांची आठवण आली, की मग अंतर सारं नको नकोसं
होतं.
सोडून सर्व, पुन्हा
घरी जावसं वाटतं,
नी नाती इथली
सारी व्यर्थ वाटतात,
कॉलेज-कामात
लक्ष लागत नाही,
त्यांचा शिवाय
एकट्याला मुळीच कर्मात नाही.
येत असेल का माझीही आठवण कोणास,
असा प्रश्नही नेहेमीच पडतो,
कामात असलेल्या मत्रांचे फोन,
क्वचितच कधीतरी अचानक येतात.
लहानपणीचा
गोष्टींची फारशी आठवण नाही,
पण नाती ती कधी
तुटली नाहीत,
आजही भेटलो की
फार बर वाटतं,
तुम्हा सर्वा
मित्रांशिवाय येथे जगणं व्यर्थ वाटतं!
No comments:
Post a Comment