Tuesday, December 15, 2015

भेट चुकून कधी झाली तर....


तो तिला विसरत नाही,
नी ती त्याला कधी माफ करत नाही,
झालेल्या चुकांची जाणीव असून सुद्धा,
त्यांचा संवाद काही होत नाही.
        तशी ती अजुन एकटीच जगते,
        नी तोही अजून तिचीच वाट पहातो,
        पण त्याचा नेहेमीचा प्रयत्नांनी,
        तिला फक्त रागच येतो.
स्वाभिमान तर दोघांचा दुखावला,
त्रास याचा दोघांनाही झाला,
पण जगाचा या नियमांत,
शब्द तिनी त्याला सोडायचा दिला.
        पुन्हा कधी भेटणार नाहीत,
        नी संवादही कदाचित साधणार नाहीत,
        वर्ष जशे सरतील तसे,
        नवीन लोकांचात हरवून जातीलही.
आठवण मात्र नेहेमी राहील,
कमी त्या नात्याची नेहेमी जाणवेल,
वेळेस न भेटल्याचे दुखः,
वय वाढल्यावर नक्कीच दाटेल.
        जगण्याच्या त्या धावपळीत मग,
        गाठ्भेट मग कधी अचानक घडेल,
        "खुश तर आहेस नं?" विचारात,
        तो त्याचे अश्रु लापवेल.
तीही थोडीशी गोंधळून जाईल,
शब्द सारे विसरून जाईल,
"हे माझे ते नी हा आमचा छोटा" सांगत,
कॉलेजचं सारं तिला स्पष्ट आठवेल.
        तोही गंभीर विचारात हरवेल,
        तिचा साठी घालवलेला वेळ व्यर्थ त्याला वाटू लागेल,
        कित्येक वर्ष संवाद व्हावा या आशेत थांबलेला तो,
        दोनच शब्दात पुढे काय बोलु या प्रश्नात पडेल.
तीही विचारात अचानक हरवलेली असेल,
तिचे ते तसे थोडे शांत पाहत असतील,
नी शांततेत त्या तेच थोडा संवाद साधतील,
निवांत भेटू कधीतरी सांगत दोघेही तिथनं निघून जातील.
        तो तसा फार हादरलेला असेल,
        एकटेपणा त्याला नकोसा वाटेल,
        खरंच आपलं चुकलं का विचार करत,
        मित्रांना तो हेच सारं सांगू लागेल.
दिवसा अखेर कामांतनं ती मोकळी होऊन,
विचार ती करू लागेल,
चुकला निर्णय समजुन ती,
हळूच एकटी थोडे अश्रु काढेल.
        अहंकाराचा या भांडणात,
        आयुष्य दोघांचा फार अवघड असेल,
        आणि इतरांसाठीच जगत मग,
        त्यांना अहंकाराच्या नुकसानाचा अर्थ कळेल.

No comments:

Post a Comment

Serenity Prayer

  #SerenityPrayer #Peace #MentalHealth #Acceptance #Courage #Intelligence #Empathy